जनतेज न्युज

पुणे-नाशिक महामार्गावरील आंबीफाटा येथे चारचाकी व दुचाकीचा भीषन अपघात

प्रथिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यावर कारच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घडली आहे.राजेश पवार हे आंबीखालसा फाटा येथे रोड ओलांडत असताना भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली यात पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.राकेश रावत राहणार ओतूर ता जुन्नर हे त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच ४३ बी वाय ६८९०हिच्यातून आपल्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी शिर्डी येथे चालले होते. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान आंबीखालसा फाटा येथे आले असता राजेश लालू पवार राहणार गुंजाळवाडी संगमनेर हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १७ बी ए ९८१५ हिच्या वरून आंबीखालसा फाट्यावर रस्ता ओलांडत होते त्याच दरम्यान तेथून चाललेल्या ट्रक मुळे लक्षात न आल्याने भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले आहे. जखमींना महामार्ग पोलिस व स्थानिक नागरीकांनी संगमनेरच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.