जनतेज न्युज

कारागृह कॉन्स्टेबलची कन्या “मीस इंडिया ग्लोबल”!

प्रतिनिधी, बीड : नवी मुंबईतील वाशी इथे झालेल्या टॅलेटीका आयोजित स्पर्धेत बीडच्या भूमिका सावंतने मिस इंडिया ग्लोबलचा किताब पटकावला आहे.मूळची बीड येथील असलेल्या भूमिकाचे वडील सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल आहेत. वडिलांच्या नोकरीमुळे तिचं सध्याचे वास्तव्य हे कल्याण मध्ये आहे. आता बीड मध्ये आल्या नंतर तिचे सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षी तिने हा बहुमान मिळवला. एकीकडे अभ्यास, जिम, ग्रुमिंग, डाएटीग सेशनवर लक्ष केंद्रित करतानाच भूमिकाने या स्पर्धेला सामोरी जाण्याची तयारी केली. भूमिकाने वाशी येथे रंगलेल्या स्पर्धेत मिस महाराष्ट्र म्हणून सहभाग घेतला होता. इतर 24 स्पर्धकामधून 12 तरुण 12 तरुणीतून तिची मिस इंडिया ग्लोबल किताबासाठी निवड केली. या किताबाच्या अंतर्गत भूमिकाचा “मिस इको टुरिझम नायजेरिया” या स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे. तिच्या या यशानंतर तिच्या आई-वडिलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.दरम्यान यावेळी खाकीतली सौंदर्यवती म्हणून ओळख असलेल्या प्रतिभा सांगळे यांनी भूमिकाचे विशेष अभिनंदन केले. प्रतिभा सांगळे या बीड पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावला होता.या पूर्वी ग्रामीण भागातील महीलेची सीमा केवळ चूल आणि मूल पर्यंत सीमित होती. परंतु आता ग्रामीण भागातून पुढे येत असलेले टॅलेंट पाहता त्या देखील मागे नाहीत असं म्हणटल तर वावगे ठरणार नाही.