प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर आज विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन प्रशासकीय इमारती समोर धरणे आंदोलन केले आहे,
कोरोना संसर्गामुळे सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन होते यानंतर विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रम ऑफलाईन केले आहे मात्र यासाठी फक्त 45 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून कालावधीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली असून यासाठी पाठ्यक्रम पूर्ण होता विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर परीक्षा लादली असून, यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मन संताप होतोय अभ्यास करण्यासाठी परिपूर्ण वेळ मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी निवेदन ही विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले मात्र याकडे विद्यापीठाने कानाडोळा केला आहे त्या अनुषंगाने आज विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर आज रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
