जनतेज न्युज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला – आ. अंबादास दानवे

प्रतिनिधी , औरंगाबाद : आज मंगळवार 14 जून रोजी आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न गंभीर वळणावरती येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आढावा घेण्यात आला होता यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला आदेशित करून सांगितले होते की सदरील शहरातील पाणी व्यवस्था ताबडतोब सुधारित करण्यात यावी त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व मनपा आयुक्त यांनी औरंगाबाद शहरातील विविध पाण्याच्या साठ्याचा वापर करून औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आले असून, यामुळे शहरातील विविध परिसरात आता चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे.