प्रतिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार 16 जून रोजी औरंगाबाद शहरातील भाग्य नगर परिसरातील पत्रकार भवन येथे ग्राहक भारतीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की,घरगुती गॅसचा वाहनांमध्ये आणि व्यवसायाचे करणारे नागरिक सर्रासपणे वापर करीत आहे.यामुळे घरगुती गॅस हा मोठ्या प्रमाणात महाग होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करुन घरगुती घ्यायचा असा बेकायदेशीर होत असलेला वापर थांबविण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये आज रोजी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांची मोठ्याप्रमाणात नुकसान होत असून यामुळे सर्वसामान्य याचा घरगुती गॅस मोठ्याप्रमाणात महाग होत आहे. यासंदर्भात ग्राहक भारती संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आज रोजी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे सदरील पत्रकार परिषद भाग्यनगर परिसरातील पत्रकार भवन येथे संपन्न झाली आहे.
