जनतेज न्युज

ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

प्रतिनिधी, बीड : ठाकरे सरकार सत्तेवरून पाय उतार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. बीडच्या माजलगाव एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी फटाके आणि पेढे भरवत हा आनंद एसटी डेपोत साजरा केलाय. पाच महिने विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण झालंच नाही. त्यामुळे आजही एसटी कर्मचा-यांची ही मागणी कायम आहे. अखेर ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांचा विजय झाला असं म्हणत कर्मचाऱ्यांनी हा आनंद साजरा केला. दरम्यान यावेळी थोर महापुरुषांच्या नावानं घोषणा देण्यात आल्या आहेत.