जनतेज न्युज

राजस्थान उदयपूर येथील घटनेच्या विरोधात हिंदू संघटनांचे आंदोलन

प्रतिनिधी, जळगाव : राजस्थान उदयपूर येथे कन्हैया तेली नावाच्या हिंदू युवकाची धार्मिक द्वेषातून निर्घुण हत्या करण्यात आली. व व्हिडिओ बनवून हिंदू धर्मियांना धमकविण्यात आले. अशी घटना राजस्थान मध्ये घडत असल्याने हिंदू समाज स्वतःला असुरक्षित समजत आहे. या प्रकारच्या धर्मांध शक्तीमुळे संविधान धोक्यात येण्याची शक्यता आहे. भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी त्वरित दखल घेऊन कठोर कारवाई करावी. अशी मागणी हिंदुत्ववादी पक्षाने व संघटनेच्या वतीने यशवंत चौधरी , गजेंद्र जयस्वाल , अनिल वानखेडे , मगन बाविस्कर , पंकज पाटील , नरेंद्र पाटील , प्रदीप पाटील , जिग्नेश कंखरे , भूषण माळी , संजय जैन , प्रवीण जैन , मनीष गुजराती , हिम्मत पाटील , निलेश बारी यांनी केली आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात हिंदुत्ववादी पक्ष व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला. आणि हत्यारांना तात्काळ फाशी द्यावी. अशी मागणी घोषणा देऊन केली आहे. यांच्यासह हिंदुत्ववादी पक्ष व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.