जनतेज न्युज

मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ; आमदार संजय राठोड यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी, यवतमाळ : सोशल मीडिया, प्रसार माध्यमातून नेत्यांनी आपली भूमिका मांडली. 40 आमदारांनी मिळून दीपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून निवड केली. त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना आमची भूमिका आज पटली नसेल तर परंतु, दोन महिन्यांनी पटेल.मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ, अशी प्रतिक्रिया आमदार संजय राठोड यांनी दिली.