प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट हे आज औरंगाबाद शहरात परत आले आहे, आमदार संजय शिरसाट यांनी परिषद घेऊन माध्यमांशी बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरती एखाद्या मंत्री पदाची जबाबदारी दिली तर मी ती पूर्ण जबाबदारीने सांभाळेल,प्रत्येक आमदाराचे मंत्री होण्याचे स्वप्न असतात ते स्वप्न माझे पण आहे अशी इच्छा त्यांनी आज रोजी माध्यमांची बोलताना बोलून दाखवली आहे,औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पद तुमच्याकडे येईल का असा प्रश्न माध्यमाने विचारल्यावर ती त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी कोणतीही जबाबदारी मला देतील ती जबाबदारी मी पूर्ण ताकतीने सांभाळेल असे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत.शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर संजय शिरसाट हे मोठ्या प्रमाणात प्रकाशात आले होते यानंतर त्यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली होती काही शिवसैनिकांनी त्यांच्या पोस्टरला काळीही फासले होते. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघाले आहे मातोश्रीची दारे बंद केले तर यांना श्वास घेणे मुश्किल होईल काय गरज होती भावना गवळी ना पदावरून काढण्याची हेच चालू आहे त्यामुळे शिवसैनिक नाराज आहे आज त्यांच्या मागे लागली म्हणून तुम्ही पद काढून घेतले त्यामुळेच सर्व आमदार नाराज आहे.
