जनतेज न्युज

लांडगे- दळवींचा फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत धुमाकूळ चार दिवस पोलीस कंट्रोल रूमला फोन केला, तरीही जुगार अड्डे बंद होत नाहीत

प्रतिनिधी, पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने मागील काही दिवसात फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डयांवर कारवाई करून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तथापी एवढ्या मोठ्या प्रमाणात फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून देखील जुगार अड्डे बंद झाले नाहीत. दिवस-रात्र जुगार अड्डे आणि क्लब, मादक द्रव्यांची विक्री आणि वापर, सुरू आहे.
या जुगार अड्डयांना फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे व अवैध धंदयाचे वसुलदार नामदार गणेशशेठ दळवींचा आशिर्वाद असल्यानेच जुगार अड्डा मालकांची मुजोरी वाढली आहे. जुगार अड्डा मालक नंदू नाईक, पप्पु शेख, कुमारखडके हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून नंदू नाईक हा मोक्का कारवाईत जामिनावर आहे.
आज चार दिवस झाले, आम्ही पोलीस नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहोत. जुगार अड्डे सुरू आहेत अशी तक्रार दिली जात आहे. परंतु कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. सदरहू जुगार अड्डा मालकांसोबत श्री. गणेशशेठ दळवी यांचा करार झाला असून वसुलदार श्री. गणेशशेठ दळवी यांना दरमहा लाखो रुपये मिळत असल्यानेच जुगार अड्डा मालकांवर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हे महिलांचे तस्कर पप्पुची खाजगी वाहने वापरत असून सारथ्य स्वतः तडीपार असलेले गुंडच करीत असल्याचेही एैकीवात आहे. त्यांची खरी चौकशी केल्यास हे उघड होऊ शकते. परंतु पोलीस निरीक्षकांची चौकशी करणार तरी कोण हा प्रश्न आहे. तसेच वसूलदार गणेशशेठ दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यास, एखादया मंत्र्याच्या घरात जेवढी संपत्ती नसेल एवढी संपत्ती स्थावर जंगम मिळकती आढळुन येतील असे बोलले जात आहे. परंतु प्रश्नच हाच आहे की, पोलीसांच्या मालमत्तेची चौकशी कोण करणार… ईडी तर राजकारण्यांच्या मागे आहे… मग प्रशासकांची चौकशी होणार तरी कशी हा गहन प्रश्न आहे.