प्रतिनिधी, धुळे : भारत भ्रमणाला निघालेल्या किरण वर्मा यांनी आतापर्यंत देशभरात 5 हजार 400 किमीहून अधिक प्रवास केला आहे. त्यांनी 28 डिसेंबर 2021 पासून केरळची राजधानी असलेल्या त्रिवेंद्रम ही येथून पदयात्रा सुरू केली.किरण वर्मा यांनी चेंज विथ वन फाऊंडेशनची स्थापना केली आहे. याद्वारे ते सिम्पली ब्लड आणि चेंज विथ वन मील नावाचे दोन कार्यक्रम चालवतात, गरजूंना रक्त पोहोचवून आतापर्यंत त्यांनी 35000 लोकांचे प्राण वाचवल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात सुमारे 12 हजार लोकांना दररोज उपचारासाठी आवश्यक रक्त मिळत नाही. त्यामुळे देशात दरवर्षी सुमारे अनेक रूग्णांचा मृत्यू होतो. दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते किरण वर्मा यांनी रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी देशभर पदयात्रा काढण्याचे ठरवले असून, सध्या त्यांची ही वारी 5 हजार 400 किमी चा प्रवास करून धुळे येथे पोहचली आहे. कोरोनाच्या काळात रक्ताचा खूप मोठा तुटवडा देशात जाणवत होता त्यामुळे अनेक जणांचे दुर्दैवी मृत्यू देखील झाले आहेत यापुढे रक्ताचा तुटवडा जाणू नये म्हणून रक्तदानासाठी पुढे या असा संदेश घेऊन किरण वर्मा भारतभर 21000 किलोमीटरची यात्रा पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.देशभरात रक्तदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत भ्रमणाला निघालेल्या किरण वर्मा यांनी आतापर्यंत 5 हजार पेक्षा अधिक चा प्रवास पूर्ण केला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून ते निघाले आहे पुढे 21 हजार किलोमीटर चा प्रवास करण्यासाठी अजून 2 वर्ष ते ही यात्रा सुरू ठेवणार आहे.
