जनतेज न्युज

खसाळा राख बंधारा फुटल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले – आर.विमला,जिल्हाधिकारी नागपूर

प्रतिनिधी, नागपूर : कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा फुटला असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. राखमिश्रीत पाण्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे राखमिश्रित पाणी खसाळा, मसाला, कवठा, खैरी गावांमधील नाल्यांमधून वाहत आहे. हे पाणी नाल्यावाटे कोलार आणि कन्हान नदीतही गेले.खसाळा राख बंधारा ३४१ हेकटर क्षेत्राचा असून. धान,सोयाबीन, कापूस व इतर फडभाज्यांचे नुकसान झाले आहे.नागपुर जिल्हाधिकारी कार्यलय कडे अध्याप पूर्ण माहिती आली नसून पण शेतीचे नुकसान झाले आहे अशे मत नागपुर जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.