जनतेज न्युज

महिलेची अवैध सावकाराच्या जाचातून सुटका मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

प्रतिनिधी , बुलडाणा : अवैध सावकारापासून भडगाव येथील उषाबाई साळवे व त्यांच्या कुटुंबांच्या जीविताचे रक्षण व्हावे.उपनिबंधक कार्यालयाकडे भडगाव येथील अवैध सावकार गणेश साखरे यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही त्यांची कुठलीही दखल उपनिबंध कार्यालयाने घेतली नसल्याने, आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उषाबाई साळवे यांनी एक दिवशी धरणे आंदोलन केले आहे.. यासंदर्भात यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही तक्रार केली आहेत ..तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही या संदर्भात तक्रार दिलेली आहे..