जनतेज न्युज

नवी मुंबई मनपा निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर

प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबई मनपा निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण 25 प्रभागात महिला व पुरुषांसाठी ओबीसी आरक्षण आज जाहीर करण्यात आले. प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत २०.५९ टक्के जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ओबीसी आरक्षण सोडतीला इच्छुक उमेदवारांचा अल्प प्रतिसाद लाभला. सोडत जाहीर होत असलेले विष्णुदास भावे नाट्यगृह संपूर्ण रिकामे पहायला मिळाले. वारंवार निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने शिंदे गटासह सर्व प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी या आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली.