प्रतिनिधी, वर्धा : विरोधी पक्षनेता अजित पवार वर्धा जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागात पाहणे करता आले असता हिंगणघाट येथील अतिवृष्टीची त्यांनी पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पाहणी दौऱ्यामध्ये अजित पवार यांचे सोबत होते. महागाई वाढली आहे. आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो तेव्हा, एस.डी.आर.एफ चे नोर्म बाजुला ठेवले. आणि त्याच्या तिप्पट मदत ह राज्यातल्या बाधित शेतकऱ्यांना केल्याचे निर्णय घेतले होता. तश्याच प्रकारचे निर्णय आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले पाहिजे. अशी माझी स्पष्ट मागणी आहे. आताची परिस्थिती बघता ,शेतकऱ्यांची झालेले हाल बघता आणि लोकांच्या झालेल्या नुकसाना बाबत आपल्याला त्यात बदल करावा लागेल अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करु.
