जनतेज न्युज

बारा ज्योतिर्लिंगाची पायी कावड यात्रा करणारा अवलिया बीडमध्ये दाखल

प्रतिनिधी, बीड : बारा ज्योतिर्लिंगाची पायी कावड यात्रा करणारा एक अवलिया तरुण बीडमध्ये पोहोचला . 29 एप्रिल रोजी गंगोत्री पासून या कावड यात्रेस सुरुवात झाली होती. आतापर्यंत त्याने सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण केले. मूळचा नोएडा येथील राहणारा प्रवीण भाटी हा कोणताही पण न करता ही यात्रा करत आहे. परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेशातील मलिकार्जुन आणि तामिळनाडूतील रामेश्वरम हे तीन ज्योतिर्लिंग तो आणखी करणार आहे. आतापर्यंत या तरुणाने 4000 km चं अंतर पार केले. तर आणखी 1700 किलोमीटरची पायी कावड यात्रा सुरूच राहणार आहे. प्रत्येक शिवभक्ताला संपूर्ण आयुष्यात बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं, अशी इच्छा असते. मात्र या तरुणाने ही पायी केलेली कावड यात्रा एक भक्त म्हणून दाद देणारीच म्हणावी लागेल.