प्रतिनिधी, जालना : अर्जुन खोतकरांच्या निर्णयाचे शिवसेनेने स्वागत करत खोतकरांना शेवटचा जय महाराष्ट्र केला. आज अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटाला समर्थन देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याची घोषणा केली. त्यानंतर तातडीनं शिवसेनेनं शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.. खोतकरांबद्दल विचारलं असता अर्जुन खोतकर यांनी मला फोन केला आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या..त्यामुळं त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांना शेवटचा जय महाराष्ट्र करतो असं घोसाळकर यांनी म्हंटलंय.त्याचबरोबर खोतकर गेल्यानं शिवसेनेला काहीही फरक पडणार नसल्याचं सांगत एक दिवस अर्जुनराव दगा देणार हे मला पक्क माहीत होतं.पण त्यांच्या जाण्याने शिवसेनेला जराही फरक पडणार नसल्याचं त्यांनी म्हंटलंय.तर खोतकर यांचा शिवसेना सोडण्याक निर्णय हा दुर्दैवी असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी म्हटलं आहे.
