प्रतिनिधी, यवतमाळ : विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार हे यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरग्रस्तांची पाहणी करीत आहे.अशातच आज महागाव तालुक्यातील शिरपुल्ली गावाला भेट दिली असता शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असताना शेतकऱ्यांनी आमचे अतोनात नुकसान झाले आहे असे सांगितले असता व अशा नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करतात याकरिता यवतमाळ जिल्ह्याचे नाव आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचे नाव झालेला आहे याला थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासमोर दुखणे मांडले विरोधी पक्षनेते अजित दादा पवार शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पूरग्रस्ताची पाहणी केली व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न केला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे या संदर्भात 302 चा गुन्हा कोणावर दाखल करायचा असा सवाल विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. जे संकट मराठवाडा विदर्भावर आले आहे त्या संकटामधुन त्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, तुम्ही आत्महत्या नका करु. असा मुख्यमंत्र्यांनी आत्मविश्वास दिला पाहिजे. तुम्हाला या संकटातुन सरकार बाहेर काढेल.मुख्यमंत्र्यांना इतकेच बोलता येत आहे का? शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांना दौरे महत्त्वाचे आहेत की माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. याचा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केला पाहिजे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नंतर तुम्ही लक्ष देणार का ? याचे उत्तर मला सरकारने दिलेच पाहिजे.
