प्रतिनिधी, नागपूर : नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामदासपेठ भागातील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये अतिशय शिताफीने धाडसी चोरी झालेली आहे. एटीएम मशीनचे नुकसान न करता चोरट्यांनी पाच लाख 80 हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. ही बाब दुपारपर्यंत कुणाच्याही लक्षात देखील आली नाही. दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास एटीएम मधील रक्कम संपल्यामुळे एटीएम मध्ये चोरी झाल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर लगेचचं सीताबर्डी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
