जनतेज न्युज

गुजरात राजस्थान निघून गेल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही राज्यपालाचे वादग्रस्त वक्तव्य

प्रतिनिधी, मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही असं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे.