प्रतिनिधी, चंद्रपूर : राज्यपालांचे वक्तव्य बेताल आहे. महाराष्ट्राने गुजराती आणि राजस्थानी लोकांना पोसले आणि मोठे केले. अदानी-अंबानी या राज्यात मोठे झाले. आज हे वक्तव्य करून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. यासाठी त्यांनी तमाम मराठी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून, भाजपने यांना परत बोलवावे, असेही नाना म्हणाले.
