प्रतिनिधी : चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या भेटीवर , राजुरा तालुक्यातील पूरबुडीत शेतशिवारांना स्वतः भेटी देत परिस्थिती पाहिली, राज्यामध्ये साडेदहा लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची दिली माहिती, राज्यातील दोन लोकांचे असंवैधानिक सरकार स्वतःच्या मस्तीत असून अद्याप शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई नाहीच यावर केली टीका, चंद्रपूर जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या संदर्भात बोलताना सत्तेच्या उन्मादात असलेल्या या सरकारला लोकशाही पद्धतीने घरी पाठवू- आत्महत्या करू नका असे केले आवाहन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या भेटीवर आहेत. राजुरा तालुक्यातील पूरबुडीत शेतशिवारांना स्वतः भेटी देत त्यांनी परिस्थिती पाहिली. रस्ता चिखलाचा असल्याचे पाहून पटोले आणि अन्य नेत्यांनी बैलगाडी हाकण्याची हौस देखील पूर्ण केली. भेटीअंती राज्यामध्ये साडेदहा लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील दोन लोकांचे असंवैधानिक सरकार स्वतःच्या मस्तीत असून अद्याप शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई नाहीच यावर त्यांनी टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या संदर्भात बोलताना सत्तेच्या उन्मादात असलेल्या या सरकारला लोकशाही पद्धतीने घरी पाठवू, आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी केले.शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका काँग्रेस पक्षाची आहे
