जनतेज न्युज

जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग महादेव मंदीरात भाविकांची गर्दी

प्रतिनिधी, उसमानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणुन प्रसिध्द असलेल सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील निसर्गरम्य ठिकाण तसेच स्वतः प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग म्हणजे येडशीचे रामलिंग महादेव मंदीर . रामायण काळात प्रभु राम लक्ष्मणासह  माता सीतेले शोधत आले असताना श्रीरामांनी या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून शिवलिंगाची स्थापना केल्याची अख्याईका आहे . तसेच प्रभु श्रीरामाला मदत करणारे जटायु पक्षी रावणासोबत युध्द करून जखमी झालेले व जखमी अवस्थेत श्री रामाची वाट पहात असलेले हेच ते ठिकाण . प्रभु श्रीरामाने जठायुच्या अंतीम क्षणी पाणी पाजण्यासाठी बान मारून पाणी काढले अशी अख्याईका असुन तोच रामकुंड धबधबा श्रावणापुर्वी सततच्या पाऊसाने प्रवाहीत झाल्याने कोरोणा निर्बंधामुळे दोन वर्ष निसर्गाचा आनंद न घेऊ शकले भाविक पर्यटक येथे श्रावण सोमवारा निमीत्त गर्दी करत आहेत . यामुळे हा निसर्गरम्य परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलला असुन नागरीक सहकुटूंब आनंद घेत आहेत .