जनतेज न्युज

श्रावण सोमवार निमित्त ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर चे ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारची महापूजा मोठ्या भक्तीमय धार्मिक वातावरणात संपन्न झाली.यावेळी काशी पिठाचे नूतन जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी ची यांची प्रमुख उपस्थिती होती.श्रावण सोमवार निमित्त सकाळपासूनच भाविकांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीला फुलांची सुंदर आणि आकर्षक अशी आरास करण्यात आली होती.
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त संपूर्ण सिद्धेश्वर मंदिरात एक धार्मिक वातावरण बघायला मिळाले. पहाटेपासूनच अबाल वृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात मंदिरात नित्योपचार झाले असले तरी भाविकांना मज्जाव होता.त्यामुळे सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भावीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.