जनतेज न्युज

राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आंदोलन

प्रतिनिधी,ठाणे : महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या मातीचा अपमान कोणी ही सहन करणार नाही. जेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर वक्तव्य केले होते तेव्हाच त्यांना हकलण्याची वेळ आली होती. पण आता अती झाले.मराठी माणुस भिकारी आहे असं त्यांना वाटत असेल तर मराठी माणुस भिकारी नाही. या मातीने अनेकांना श्रीमंत केले आहे.पण मराठी माणूस संस्कृतीने आणि संस्काराने श्रीमंत आहे. राज्यपाल समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. : राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ डॅा.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राजभवनावर जाण्याचा प्रयत्न. ठाणे पोलिसांनी डॅा.जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे घेतले ताब्यात. . सर्व कार्यकर्ते कोपरी पोलीस ठाण्यात आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे घेतले ताब्यात.