प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा शहराला लागून असलेल्या धाड नाका परिसरातून एका घरात लपून बसलेल्या जखमी माकडाला 2 ऑगस्टच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास बुलढाणा वन विभागाने रेस्क्यू केले आहे..गौतम साळवे राहणार धाड नाका सागवान यांच्या घरात काल एक जखमी माकड येऊन बसला होता. त्यांनी माकडाला हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. याची माहिती त्यांनी सोमवारी बुलढाणा वन विभागाला दिली. रेस्क्यू टीम खामगावला गेली होती परंतु रेस्क्यू टीमचे वाहन चालक संदीप मडावी कमी वेळात गौतम साळवे यांच्या घरी पोहोचले व रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांनी या जखमी माकडाला रेस्क्यू करत प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले व नंतर राजूर घाटात सोडून दिले.
