जनतेज न्युज

आदित्य ठाकरे यांच्या सभेचा या गोष्टीशी काही संबंध नाही – उदय सामंत

प्रतिनिधी, पुणे : आपण असं महाराष्ट्राच्या जनेसमोर ठेवूया नको की आम्ही आदित्य ठाकरे यांच्या ताफाचा पाठलाग करत होतो.
कार्यक्रम संपल्यावर तानाजी सावंत यांच्या घरी निघत होतो. कोणाचा ही ताफ्याचा पाठलाग करत नव्हतो.
सिग्नल होता म्हणून नियमानुसार तिथे थांबलो होतो. ५०-६० शिवसैनिक होते परंतु त्यांनी काहीच केले नाही. जे काही केलं ते १२-१५ लोकांनी केलं आहे.
हल्ला माझ्यावर झाला आहे. माझा जीव वाचला आहे.
मुख्यमंत्र्यांना Z+ ची सुरक्षा आहे आणि मला Y+ सुरक्षा आहे.
कोण काय टीका करत आहे मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही.
आदित्य ठाकरे यांच्या सभेचा या गोष्टीशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही.