प्रतिनिधी, चंद्रपूर : पुरग्रस्तांचा वेदनेवर अद्यापही कुणीच मायेची फुंकर घालली नाही.राज्यातील बडे नेते चंद्रपूरात आले खरे मात्र केवळ आश्वासन देण्यापलीकडे त्यांनी फार काही केलं नाही.सरकारचा मदतीकडे पुरग्रस्त आस लावून बसले आहेत.अश्यात आज जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे.किमाण केद्रीय पथकाला तरी पुरग्रस्तांचा वेदनांची जानीव होवो,या आशेत पुरग्रस्त आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पुरानं शेतजमीन अक्षरशः ओरबडीयं.हजारो घरात पाणी शिरलं. यामुळं अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले.हजारो नागरिकांना स्थलांतरीत करण्याची वेळ प्रशासनावर आली.पुर ओसरला खरा मात्र पुरग्रस्तांचा डोळ्यात अद्यापही पुर दाटला आहे.राज्याचे माजी उप मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,आमदार सूधिर मुनगंटीवार,आमदार विजय वडेट्टीवार,आमदार सूभाष धोटे,आमदार किशोर जोरगेवार यांनी पुरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानग्रस्तांचा वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला.मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.मात्र हे आश्वासन कोरडे ठरले.अद्याप बळीराजाला मदत मिळालेली नाही. अश्यात चंद्रपूर जिल्हातील वरोरा,भद्रावती ,राजूरा तालुक्यातील पुरग्रस्त भागाला आज भेट दिली आहे.राज्याला पुरग्रस्तांचा वेदना कळल्या नाहीत. किमान केंद्राला बळीराजाचे दुःख कळेल,ही माफक आशा बळीराजाची आहे.
