जनतेज न्युज

थकीत उस बिलाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचा सोलापुर -धुळे महामार्गावर रास्ता रोको

प्रतिनिधी, उस्मानाबाद : पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातील काही कारखानदारांनी उस नेऊन पाच महिने झाले तरी पुर्ण बील अद्याप दिले नाही . यामुळे शेतकरी अडचणीत आला असुन अशा कारखानदारावर गुन्हे दाखल करून गोडवान सिल करून शेतकऱ्यांना बील अदा करावीत या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय दुधगांवकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर येडशी येथे जोरदार रास्ता रोको करत घोषणाबाजी केली .आठ दिवसात बिल न मिळाल्यास गणीमी कावा करून साखर आयुक्त कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय , सहकार आयुक्त कार्यालय फोडू असा इशारा दुधगांवकर यांनी दिला आहे .