प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अति दक्षता विभागामध्ये रात्री दहा ते अकरा वाजे दरम्यान एका रुग्णास आणले असता त्याच्या नाकातून डोक्यातुन रक्त येत होते आणि ज्यांनी पेशंटला आणले होते त्यामध्ये कोणी नातेवाईक नव्हते तरी डॉक्टरांनी भरती करुन घेतले . काही वेळाने नातेवाईक दारू पिऊन आले आणि त्यांनी शिवगाळ करणे सुरु केले त्यातील एकाने मारण्याचा प्रयत्न केला असता हातातील लोखंडी कडे लागुन डॉक्टरांना गंभीर स्वरूपाची जखम झाली आसल्याचे डॉ ऋषिकेश फडणवीस म्हणाले डॉक्टरांनी त्याला तपासून सिटीस्कॅन आणि ई सी जी साठी पाठवलं नंतर वार्डामध्ये पाठवून दिले डोक्याला मार लागल्यामुळे पेशंट उपचार दरम्यान प्रतिसाद कमी देत होता डॉक्टरला मारहाण केली तरी डॉक्टरांनी महत्वाची ट्रीटमेंट करुन तिथून बाहेर पडले . ज्या डॉक्टरांना मारहाण झाली त्यांना चार ते पाच टाके पडतील ऐवढी जखम झालेली आहे . घाटी रुग्णालयात दोन सुरक्षा एजन्सी आहे त्याच्यात ताळमेळ नाही पेशंट जवळ दोन व्यक्तींना राहण्याची परवानगी आहे,तर वार्डामध्ये 10 ते15 नातेवाईक वार्डात मध्ये असतात या वेळी सुरक्षा एजन्सीचे काम आहे कमी नातेवाईक सोडणे. एवढे नातेवाईक आत मध्ये आल्यानंतर डॉक्टर ट्रीटमेंट करणार कशी, यावेळी डॉक्टरांनी सांगितले की जो पर्यंत आरोपी अटक होत नाही आमच्या प्रमुख मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
