प्रतिनिधी, जळगाव : काल रात्री पुणे येथे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचा गाडीवर हल्ला झाला परंतु उदय सामान यांचा गाडीवर हल्ला झाला नाही पाहिजे होता पण बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आता जागा झाला आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला बाळासाहेबांच्या विचाराने घडलेला हा कार्यकर्ता हा शिवसेनेचे नुकसान कदापि सहन न करणारा आहे बाळासाहेबांचा सुपुत्राला खुर्चीवरून खाली उतरवलं सामंतांच्या गाडीवर काय तो महाराष्ट्राच्या कोणाचाही गाडीवर शिवसैनिक हल्ला करू शकतो तो आता थांबणारा नाही. जो पर्यंत उद्धव साहेब आदेश करतील आता कोणाच्याही गाडीवर हल्ला करू नका आपण महाराष्ट्राच्या संस्कार व संस्कृती जोपासली पाहिजे ज्यावेळेस उद्धव साहेबांनी हे बंडखोर आमदार मंत्रालयात येताना त्यांना कोणीच अडवू नये अशी आदेश दिल्यानंतर शिवसैनिकांनी तो पाडला महाराष्ट्र हा तेव्हा शांत होईल जेव्हा उद्धव ठाकरे आदेश देतील अन्यथा तो पेटून उठेल आणि तो पेटून उठल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
