प्रतिनिधी, बीड : काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. देशात वाढलेली महागाई जीएसटी आणि अग्निपथ योजना रद्द करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशामध्ये महागाई वाढली आहे. तर बेरोजगारीचा आकडा देखील वाढतोय त्यामुळे सरकारने तात्काळ महागाई आणि जीएसटी कमी करा अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
