जनतेज न्युज

हर घर तिरंगा या अभियानामध्ये भारतीय जनता पार्टी चा सहभाग

प्रतिनिधी , नांदेड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हे अभियान प्रशासनाच्या वतीने साजरी करण्यात येत असून त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहा हजार झेंडे लावण्याचा संकल्प केला असून प्रत्येक प्रभागांमध्ये मंडळाचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे उपक्रम राबवणार आहेत तरी सर्वसामान्य जनतेने झेंडे मिळवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधावा असे आव्हान देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे आज जिल्हाधिकारी विपिन इटनकर  व मनपा आयुक्त सुनील लहाने यांच्या हस्ते नागरिकांना झेंडे वाटप करण्यात आले आहे.