जनतेज न्युज

ताजबाग मध्ये ताजुद्दीन बाबाच्या 100 व्या उरूस निम्मित पोलिसांनी सेरक्षेचा आढावा घेतला

प्रतिनिधी, नागपुर : नागपूरच्या ताजबाग मध्ये ताजुद्दीन बाबाच्या 100 व्या उर्स च  आयोजन 21 ते 30 ऑगस्ट दरम्यान केलं जाणार आहे यावर्षी शंभरावा उरूस असल्याने ताजुद्दीन बाबाचे भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहे त्यामुळे या परिसरात पोलिसांनी आतापासूनच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यायला सुरुवात केली. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी पाहायला मिळाली.  यावर्षी शंभरावा उर्स असल्याने त्याच वेगळे महत्त्व आहे त्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहे.  नियोजनात कुठलीही गडबड राहता कामा नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत पोलीस आपलं नियोजन करत आहे. उर्स  दरम्यान दररोज 2000 च्या वर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात राहणार आहे.