जनतेज न्युज

दुचाकी चोरट्याला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,९ दुचाकी केल्या जप्त

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.
अशातच सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत गुन्हेगार सईद तांबोळी याला अटक केली आहे.
तो चोरीच्या दुचीकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आहे.
या कारवाईमध्ये त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त केल्या असून त्याचा साथीदार दीपक वैकुंठचा सोलापूर पोलीस शोध घेत आहेत.
सोलापूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सोलापुरातील नागरिकांकडून त्यांच कौतुक होत आहे.