प्रतिनिधी, वर्धा : जिल्हयात काही गावांमध्ये जनावरांमध्ये विशेषत: म्हैसवर्गीय जनावरांमध्ये अज्ञात रोगाची लागण झाल्याने काही प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने तात्काळ दखल घेऊन जनावरांवर औषधोपचार सुरु केले आहे. हिंगणघाट तालुक्यातील उमरी (येडे), आष्टी तालुक्यातील आष्टी, पेठ अहमदपूर, भारसवाडा, देलवाडी, खडकी तसेच आर्वी तालुक्यातील रसुलाबाद या गावातील जनावरांमध्ये विशेषत: म्हैसवर्गीय जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. रोगग्रस्त जनावरांचे रोग नमुने जिल्हयातील आणि नागपूर येथील विभागीय प्रयोगशाळेच्या चमुने सबंधित गावात जावून गोळा केले आहे. प्राथमिक स्तरावर बॅबेसिया, ॲनाप्लाझमा, ट्रिपॅनोसोमियासिस या मिश्र स्वरुपातील रोगाने जनावरांचा मृत्यु झाल्याचे दिसून येते. सदर आजार जनावरांपासून
