जनतेज न्युज

शरद पवार यांच्या मते सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता बदललेली दिसते – नरेश म्हस्के

प्रतिनिधी, ठाणे : शरद पवार हे देशाचे नेते आहेत. आज या वयात ते ज्या तडफेने काम करतात ते बघून आमच्यासारख्या तरूणांनाही प्रेरणा मिळते. आज त्यांनी राजकारणात सुसंस्कृत नेतृत्वाचा दाखला देताना ठाणे जिल्ह्यातील काही नेत्यांचा उल्लेख केला. ठाण्याने नेहमीच सुसंस्कृत नेतुत्व दिले आहे. परंतु, शरद पवार यांच्या मते बहुतेक सुसंस्कृत नेत्यांची व्याख्या आता बदललेली दिसते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी घनिष्ठ संबंध ठेवणे आणि त्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे हे त्यांच्या लेखी सुसंस्कृत पणाचे लक्षण असेल. गृहमंत्री पद मिळाल्यानंतर डान्स बार मालकांकडून खोक्याने पैसा गोळा करण्यात त्यांना सुसंस्कृतपणा दिसत असेल. त्यामुळे त्यांचा हा सुसंस्कृतपणा त्यांनाच लखलाभ असो. ठाण्यातील जनता ही सुज्ञ आहे. त्यांनी ज्या नेत्यावर एवढी वर्षे विश्वास दाखवला तो नेतां आज राज्याचे नेतृत्व करत आहे.सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात समरसून जाणारा आमचा नेतां केवळ सुसंस्कृतच नाही तर कर्तव्यदक्षही आहे.
हातची सत्ता गेल्याने विरोधक कासावीस झालेले आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने कामाचा झपाटा लावला आहे ते बघून सत्तेची स्वप्नही त्यांना पडेनाशी झाली आहेत. त्या अस्वस्थेतेतून अशा प्रकारची विधानं त्यांच्याकडून येत आहेत. आणि हो ठाणेकर जनताच नव्हे तर राज्यातील जनता आमच्या सुसंस्कृत नेत्याचे हात भक्कम करतील याबाबत कुणीही चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला , समाजकारणाला आणि सत्तेला जो काही लोकांनी काळीमा लावण्याचे काम केले होते , ते पुसण्याचे काम ठाण्यातील सुसंस्कृत नेत्याने केले आहे याचा आम्हाला अभिमान आहे.