जनतेज न्युज

मुंबई गोवा महामर्गावर हमरापूरफाटा ब्रीजवर भीषण अपघात; १४ जण जखमी

प्रतिनिधी, रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई गोवा महामर्गावर हमरापुर फाटा ब्रिजवर पहाटे 2:00am ला टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रेलरमध्ये अपघात झाला असून
टेम्पो ट्रॅव्हलर मधील एकूण 22 प्रवासी पैकी 14 प्रवासी जखमी झाले आहेत.कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला आहे.टेम्पो ट्रॅव्हलर (MH 43 BP 0756) खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे जात असताना पेण हमरापूर ब्रीजवरील बंद पडलेल्या कॉईल ट्रेलर (MH 46 AR 0074) ला मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे.सर्व अपघातग्रस्तांना अपघातग्रस्तांचेवाली देवदूत कल्पेश ठाकूर यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.