प्रतिनिधी , जळगाव : पाचोरा येथील पत्रकार भुवनेश दुसाने हे वरखेडी येथुन आपले पेट्रोल पंपाचे कामकाज आटपुन पाचोरा येथील घराकडे गिरणा पंपिंग रोडवरील त्यांच्या घरी जात असताना पंपिंग रोड वरील नवीन रस्त्यावर अरुंद रोड वरील त्यांच्या फोर व्हीलर चा अपघात झाला. त्या अपघातात पत्रकार भुवनेश दुसाने सुरक्षित बचावले आहेत. या नवीन रस्त्यावर ठेकेदार यांच्या कडुन साईट पट्ट्या दोघाही रस्त्यावर केलेल्या नाहीत, तर वळनावर अरुंद रोड, गाडी टन घेण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. या कारणांमुळे हा संपूर्ण रस्ता धोकादायक बनला आहे, या संपूर्ण रस्त्याची वरिष्ठांनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी भुवनेश दुसाने यांनी केली आहे.
