प्रतिनिधी, नागपुर : नागपूरच्या पाचपावली पोलिसांच्या अंतर्गत असणाऱ्या लष्करीबाग येते धक्कादायक घटना मध्यरात्री घडलेली आहे. यामध्ये पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावरती लाकडी स्टूल मारून तिची हत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी पतीचे दुसऱ्या स्त्रीशी संबंध असल्यामुळे आरोपी पती आणि पत्नीचे नेहमी भांडन होत होते आणि त्याच वादातून काल रात्री पतीने आपल्या पत्नीची डोक्यावर लाकडी स्टूल मारून हत्या केलेली आहे. त्यावेळी दहा वर्षांची मुलगी देखील घरी होती तिनेही वाचवण्याचा प्रयत्न केला पण आरोपीने आपल्या पत्नीच्या डोक्यावरती स्टूल लाकडी स्टूल मारून तिची हत्या केलेली आहे.मृतक महिलेचे नाव सोनू परशुराम ब्राम्हने असे आहे.पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे ..यामागे अजून काही वेगळे कारण आहे का त्याचा तपास पोलीस करत आहे.
