प्रतिनिधी, मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच मुंबईला दुसरी ओळख देखील आहे ती म्हणजे मायानगरी म्हणून देखील ओळखल्या जाते या मायानगरीमध्ये लहानापासून पर्यंत अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्याकरिता मुंबईत येत असतात अशातच मुंबईत कलाकार बनण्याच्या स्वप्न घेऊन बिहार मधून मुंबईत आलेल्या अल्केश कुमार या युवकाने देखील पाहिले होते मात्र मुंबईतील रोजचे धकाधकीचे जीवन आणि हातात येत असलेली निराशा आणि गावाकडे असलेल्या आई-वडिलांची जबाबदारी कुठेही काम न मिळाल्याने निराश न होता अल्केशने विदेशाच्या धर्तीवर मुंबईत गोल्डन मॅन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अल्केश कुमार हा मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळाजवळ गोल्डन मॅन म्हणून तासून तास उभा राहतो या गोल्डन मॅनला पाहण्या करिता तेथे असलेले युवक युवती या गोल्डन मॅन सोबत फोटो काढतात तसेच सेल्फीचा मोह देखील त्यांच्याकडून काढण्यापासून राहायला जात नाही या सर्वांमध्ये अल्केश कुमारची महिन्याची इन्कम जेमतेम 15000 च्या जवळपास होत असते यामध्ये त्याला त्याचं घर आणि मुंबईतील खर्च हा सर्व भार त्याला या मिळालेल्या पैशांमधून कराचा असतो मात्र तरी देखील जे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला होता ते स्वप्न करण्याची जिद्द देखील त्याने मनात बाळगले आहे आणि स्वप्न पूर्ण करण्याकरिता प्रयत्न देखील करत आहे
