जनतेज न्युज

अमरावतीत बॅनरवर लावलेल्या काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांचा अज्ञाताने फाडला फोटो

प्रतिनिधी , अमरावती : अमरावतीत आज काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सुरू आहे या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर असतांना कार्यक्रमाचे व नाना पटोले यांचे स्वागताचे बॅनर अमरावती शहरात लागलेले होते, मात्र अमरावती शहरातील शासकीय विश्रामगृह समोर लावलेले बॅनर वर काँग्रेस चे आमदार बळवंत वानखडे यांचा फोटो अज्ञात व्यक्तीने फाढल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर मी ग्रामीण भागातून असल्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा केला तो माझा फोटो फाडला अशी प्रतिक्रिया यावेळी बळवंत वानखडे यांनी दिली, आमदार बळवंत वानखडे अनुसूचित जाती प्रवर्गातून येत आहे अमरावती लोकसभा सुद्धा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवार बळवंत वानखडे आहे मात्र त्यांचा फोटो काढल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाला विरोध आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे.