जनतेज न्युज

मुले चोरणारी समजून भंगार गोळा करणाऱ्या महिलेला झाडाला बांधून मारहाण

प्रतिनिधी, सांगली : मुले चोरणारी समजून एक भंगार गोळा करणाऱ्या महिलेले मारहाण करत झाडाला बांधून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जत मध्ये हा प्रकार घडला आहे.या मारहाण प्रकरणी चार महिलांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या अफवेचा आणखी एक फटका जत मध्ये एका महिलेला बसला आहे.जतच्या ताड वस्ती येथील जुने गोडावून येथे एक महिला लहान मुलांना पळवुन घेऊन जाणारी महिला फिरत असल्याचा संशय वस्तीवरील महिलांनी आला.त्यानंतर वस्तीवरील महिलांनी भंगार गोळा करणाऱ्या महिलेला पकडलं,आणि तिला मारहाण करून त्याचे हात बांधून,तिला एका झाडाला बांधून ठेवले.सदर महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला,त्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,त्या महिलेला ताब्यात घेत,त्याची सखोल चौकशी केली. असता तालुक्यातल्या शेगाव येथील असून ती भंगार गोळा करणारी महिला असल्याचे अखेर समोर आले.केवळ गैरसमजुतीतून आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मुले चोरणाऱ्या टोळीच्या व्हिडिओमुळे हा सर्व प्रकार घडल्याचा समोर आले आहे.याप्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये चार अज्ञात महिलांच्या विरोधात भंगार गोळा करणाऱ्या महिलेला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम गरे यांनी दिली आहे.