प्रतिनिधी, औरंगाबाद : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात मागिल 22 वर्षापासुन आम्ही विविध पदावरील 2200 कंत्राटी कर्मचारी क्षयरोग दुरीकरणासाठी जिवाचे रान करीत आहोत परंतु वारंवार काही अन्यायकारक निर्णय शासनाकडुन घेतल्या जात आहेत जसे कि राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत नेमलेल्या त्रिसदसीय मंत्रीमंडळ गटाने समायोजनाचा घेतलेला स्वतःचाच निर्णय रद्दबादल केला. वेतन सुसूत्रीकरणामध्ये जुन्या व नव्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात अत्यंत तफावत आहे. कार्यक्रमातील टी.बी.एच.व्ही यांचे बाबतीत तर कळसच गाठण्यात आला. आर्थिक कृती आराखडयामध्ये 17000 मानधन दाखवण्यात आले प्रत्यक्षात ते 15500 देण्यात आले. एकीकडे आपण कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी 4ते5 टक्के महागाई भत्ता देत आहात आणि एकीकडे कत्राटी कर्मचाऱ्यांना 15 वर्षापासून तेच मानधन, प्रवासभत्ता देयक, इधन जळण भत्ता देत आहात हे अमानवीय व असंवैधानीक आहे असे यावेळी असे यावेळी कर्मचारी म्हणाले.
