प्रतिनिधी, अमरावती : आज नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने परतवाडा पासून चिखलदरापर्यंत वैराट देवीच्या मंदिरासाठी भाविकांनी पायी यात्रा काढलेली होती या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. यात्रा मध्ये जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांना सुद्धा सहभागी झाल्या होत्या. यात्रेत रविवार खासदार नवनीत राणा भाविकांसोबत तल्लीन झाल्या होत्या यात्रा चिखलदरा येथे पोहोचताच नवनीत राणा यांनी टाळ मृदुंग वाजवत फुगडी चा महिला भाविकांसोबत फेर धरला होता. या यात्रेत महिला भाविकांनी सुद्धा नवनीत राणा यांच्या सोबत फुगडी खेळण्याचा आस्वाद घेतला.
