जनतेज न्युज

इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा:- गुलाबराव पाटील

प्रतिनिधी, जळगाव : भुसावळ -भुसावळ तालुक्यातील कोठारा फुलगाव व कंडारी येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले
भुसावळ तालुक्यातील कंडारी फुलगाव कोठोरा व कठोरा बुद्रुक या चार गावाच्या 13 कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत, महाराष्ट्रातील जवळपास 17000 गाव आहेत त्या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या बीपीआर मंजूर करून त्यांना मंजुरी देण्यात आले आहे, 2024 पर्यंत महाराष्ट्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही हे धोरण ठरलेला आहे, त्या धोरणाप्रमाणे पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे,
ज्या मातीमध्ये तुम्ही राहता त्या मातीला नमन करणे म्हणजे वंदे मातरम, इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, वंदे मातरम म्हणणं काही चुकीचं नाही, चंद्रकांत खैरे स्वतः निवडून आले नाहीत त्यांना एम आय एम ने पाडलं तू सुधार मनावं बाबा, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले आहे