जनतेज न्युज

शिवसेनेच्या दोन्ही गटाला चिन्ह व नावाच्या वाटपानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी, जळगाव : या दोघांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही. मात्र तरी उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह तर त्यांच्या शिवसेनेचे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अस राहणार आहे. तर एकनाथ शिंदे यांना अधिकृत चिन्ह मिळालेले नाही मात्र त्यांच्या शिवसेनेचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे राहणार आहे. एकंदरीतच शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून महाराष्ट्रातल राजकारण ढवळून निघाल आहे. यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहेशिंदे गटाला बाळासाहेब यांची शिवसेना अस नाव मिळालं आहे. दुसरीकडे संघाची स्थापना बाळासाहेब उरूस यांनी केली आहे त्यामुळे बाळासाहेब या नावाचा योगायोग या ठिकाणी जुळून आला आहे. त्यामुळे बाळासाहेबांची सेना ही संघाची सेना असा अर्थ या ठिकाणी योगायोगाने निघतो.असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.धनुष्यबाण हे चिन्ह जनमानसात पूर्णपणे रुजल होत, आता जे नवीन चिन्ह मिळाले आहे ते रुजवण्यासाठी मोठे परिश्रम दोन्ही गटाला करावे लागतील , दुसरीकडे संघटना ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे त्यांना प्रचाराला सोपं जाणार असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले .
परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला आहे तर कापूस पिकावर लाल्या नावाचा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे संकटात असलेल्या शेतकऱ्याला आधीच्या नुकसानाची च अद्यापही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. असे म्हणत एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे. आता परतीच्या पावसामुळे झालेले नुकसानाचेही लवकरात लवकर पंचनामे करावे, अधिकाधिक मदत शेतकऱ्याला मिळावी अशी अपेक्षाही एकनाथ खडसे यांनी सरकारकडून व्यक्त केली.