प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून अचलपूर, परतवाडा दोन्ही शहर सर्वत्र परिचित आहे. परतवाडा येथे ईद सणानिमित्त काढलेल्या जुलूसमध्ये पोलिसांसमोर “गुनाहे नबी की एक ही सजा सर तनसे जुदा” हा नारे लावण्यात आल्याने खळबळ आहे. परतवाडा पोलिसांनी सुमोटो कारवाई करत या प्रकरणी आठ ते दहा आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. २ आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.
वादग्रस्त नारेबाजीमुळे परतवाडामध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुस्ताफि की सजा सर तनसे जुदा सर तनसे जुदा असे गाणे डीजेच्या तालावर व घोषणाबाजी करण्यात आल्याने यावर भारतीय जनता पक्षाचे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ही मानसिकता योग्य नसून हे नारे लावणारे कार्यकर्ते “पीएफआय” चे असावेत त्यांच्या घराची तपासणी करावी व त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई करावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.. सध्या या ठिकाणी सर्व परिस्थितीवर पोलीस नियंत्रण ठेवून आहेत. अचलपुरातील दोन्ही समुदाचे झेंडे हे झेंडे चौकातून काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.
