जनतेज न्युज

भांडुपच्या माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये दोन गुंडाचा खुले आम हत्यारे घेऊन हैदोस

प्रतिनिधी, मुंबई : भांडुपच्या माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये दोन गुंडाचा खुले आम हत्यारे घेऊन हैदोस पाहायला मिळत आहे.तुषार मोरे, सुभांष भांडे असे या गुंडांची नावे आहेत.आज सकाळी तर माता रमाबाई आंबेडकर नगर आणि भांडुप च्या विविध भागात खुले आम चाकू सुरे घेऊन फिरत होते.लोकांना ही हत्यारे दाखवून मारहाण करीत होते, धमकावत होते.हे दोघे ही अट्टल गुंड असून त्यांनी भांडुपकरांच्या मध्ये दहशत निर्माण केली आहे.त्यांच्या या गुंडशाही ला नागरिक वैतागले असून त्यांच्यावर कडक कारवाई ची मागणी होत आहे.