प्रतिनिधी, औरंगाबाद : निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव आणि मशाल हे चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात मशालीचे पूजन करून रॅली काढण्यात आली. 1990 साली औरंगाबादचे प्रथम खासदार मोरेश्वर सावे त्यावेळी सर्वात जास्त मताने निवडून आले होते त्यामुळे आताही फरक पडणार नाही असे माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदक्षिणा घालण्यात आली. ही मशाल कोणाला गद्दारांना धडा शिकवायला, गर्व से कहो हम हिंदू है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
